लोणारात पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ; दोन अधिकाऱ्यांची वेगवेगळी माहिती

मॅडम' म्हणतात हमालांचा संप, तहसीलदार' म्हणतात कर्मचारी आजारी

लोणार,
तालुक्यातील शासकीय रेशन गोदामाला आज कुलूप असल्याने स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांचे होत आहेत. विशेष म्हणजे, गोदाम बंद असण्याचे कारण विचारले असता, निरिक्षण अधिकारी आरती दांडगे मॅडम व तहसीलदार भूषण पाटील हे दोघे वेगवेगळी उत्तरे देत आहे. यातून पुरवठा िवभागात किती सावळा गोंधळ सुुरु आहे याची कल्पना स्पष्ट होत आहे.
शहरातील पुरवठा गोदाम बंद का आहे अशी विचारणा निरिक्षण अधिकारी आरती दांडगे मॅडमला केली असता, यांनी सांगितले की, “संपूर्ण जिल्हाभरातील गोदामांवरील हमालांचा संप सुरू आहे. या मुळे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे गोदाम बंद असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे तहसीलदार भूषण पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, गोदामाचा अतिरिक्त भार कालच आवारे यांच्याकडे सोपवण्यात आला होता, परंतु ते आज अचानक आजारी पडल्यामुळे गोदामाचे कामकाज होऊ शकले नाही असे सांगत आहेत.
एकाच कार्यालयातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या विधानांत इतकी मोठी तफावत कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांनी मागणी केली की प्रशासकीय विसंगतीमुळे गरीब लाभार्थ्यांना यामुळे भविष्यात धान्यापासून वंचित राहावे लागु शकते. तरी वरिष्ठ जिल्हा प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि तातडीने गोदाम सुरू उघडावे अशी मागणी लोणारकरांकडून होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!