नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते येळगाव  जलपूजण

 

 

बुलढाणा,

शहराला पाणीपुरवठा करणारा स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर येळगाव येथे जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार  संजुभाऊ गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात जलपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रम एक ऑगस्ट रोजी पार पाडला

 

यावेळी बोलताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी समाधान व्यक्त करत, जलाशय पूर्ण भरल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. मात्र, या जलाशयावर बुलढाणा शहरासह सुमारे ४० गावे अवलंबून असल्याने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाणीटंचाई टाळण्यासाठी कृत्रिम पद्धतीने पाणी वळवून जलाशयात आणण्याच्या प्रस्तावाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जलसंधारण, पाणी बचत आणि जलस्रोतांचे संवर्धन यासाठी लोकसहभागाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनीही जलाशय पूर्ण भरल्यामुळे आगामी काळात शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

कार्यक्रमात नगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलाशय परिसरात धार्मिक वातावरणात विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी जलसंपत्तीचे जतन, पाणी बचत आणि प्रभावी जलव्यवस्थापनाचा संदेशही उपस्थितांनी दिला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!