पर्यावरण दिनानिमित्त पळसखेड परिसरात वृक्षारोपण; संवर्धनाचा संदेश

लोणार,

 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाच्या पुढाकारातून पळसखेड येथील महादेव मंदिर तसेच वरदडेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण, जैवविविधतेचा समतोल राखणे आणि हरित क्षेत्रात वाढ करणे या उद्देशाने विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवर व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या प्रदूषणामुळे आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्ष हे केवळ ऑक्सिजनचे स्रोत नसून मृदा व जलसंवर्धनासही हातभार लावतात. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मापारी, तालुका अध्यक्ष गजानन मापारी, शहराध्यक्ष शुभम बनमेरू, नगरसेवक शुभम देसाई, शुभम भगत, गजानन शेळके, प्रकाश नागरे, अजित चौधरी यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र सातपुते, वनपाल वाघ, लिंबेकर, वनरक्षक कैलास चौधरी, आरू, धनगर, वाट, सातपुते, ढाकणे तसेच वन विभागाचे कर्मचारी व वनमजूर उपस्थित होते.

उपक्रमादरम्यान नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. वृक्षलागवड हा पर्यावरण संवर्धनाचा पहिला टप्पा असून लागवड केलेल्या रोपांचे संगोपन आणि संरक्षण तितकेच आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला. स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हरित पर्यावरणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!