पतिचे क्रोर्य, पत्नीच्या डोक्यात सब्बल खूपसून केला खून

 खामगाव
 घरगुती वादातून संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात व चेहऱ्यावर लोखंडी सबलने खूपसून  तिचा खून केला.  ही घटना  रेल्वे गेट जवळील झोपडपट्टी  मध्ये, १४ मे च्या मध्यरात्री घडली. या घटनेने भागात एकच खळबळ उडाली.
 अंगावर शहारे आणणाऱ्या रक्तरंजीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसाना मिळालेल्या माहितीनुसार  रेल्वे गेटच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील प्रकाश रूपलाल सोळंके वय 25 व त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके वय 22 यांच्यात 14 मे  रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कौटुंबिक वाद झाला.  हा वाद इतका विकोपाला गेला की प्रकाशने लोखंडी सबल घेऊन पत्नी सविताच्या डोक्यात ख्रुपसून निर्दयपणे  तिची हत्त्या केली.  या हल्यात  ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली व काही वेळातच तिने प्राण सोडले.
           या घटनेची माहिती खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी सदर घटनेची माहिती घेऊन या खून प्रकरणातील आरोपी असलेला पती प्रकाश सोळंके याला ताब्यात घेतले. शहर पोलिसांनी रुक्माई फाउंडेशनचे संजय खंडेराव यांना घटनास्थळावर पाचारण केले. त्यांनी व त्यांचे सहकारी रमेश अवचार यांनी रक्ताच्या थारोळ्या त पडलेल्या मृतक सविता तिचे प्रेत उचलून रुग्णवाहिकेतून येथील शासकीय सामान्य रुग्णालयाच्या शेवगारात नेले.  या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी संजय मेंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत अरोपीला अटक केलीी आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!