जिल्हयात कर वसूलीत खामगाव न.प. प्रथम तर लोणार न.प. द्वितीय क्रमांकावर

जिल्हयात नगरपालिका व नगरपंचायतीची कराची वसुली ६२%

गिरीश पळसोदकर | खामगाव
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडून चालू आर्थिक वर्षात कर वसुलीचा आढावा घेतला असता एकूण सरासरी वसुली ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक शिस्त आणि विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
या कर वसुलीमध्ये खामगाव नगरपालिकेने अव्वल स्थान पटकावले असून, त्यांनी सर्वाधिक कर वसुली करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर लोणार नगरपंचायतीनेही उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींची वसुली मात्र अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाई, जनजागृती मोहीम, तसेच सवलत योजना राबवून कर वसुली वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांबाबत थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने वसुलीत अडथळे निर्माण झाले. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव नगरपालिकेने चालू आर्थिक वर्षातील व मागील थकबाकीदारांकडून ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण १२ कोटी ४६ लाख रुपयाची मालमत्ताधारकांकडून वसुली केली आहे. या वसुलीची टक्केवारी ९४.९३ आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील ३१ मार्च रोजी ची वसुलीची आकडेवारी पाहता खामगाव नगरपालिका जिल्ह्यात एक नंबर वर असल्याचे स्पष्ट होत आहे. लोणार नगरपालिकेने ही प्रभावी कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. नगरपालिकेने १ कोटी ३३ लाख रुपयांची करांची वसुली केली आहे. या वसुलीची टक्केवारी ९२. ०५ आहे. तिसऱ्या क्रमांकावर बुलडाणा नगरपालिका आहे. या नगरपालिकेने सहा कोटी ९४ लाख रुपयांची वसुली केली आहे. याची टक्केवारी ८७.२४ आहे.
या वसूलीसाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांचे प्रमुख कर अधीक्षक भागवत काळे होते. तर पथकात लिपिक दीपक कल्याणकर, श्याम मावळे, महेश अवकाळे, संतोष तायडे, अनिल गोलाईत, पंकज कळिमकर, ऋषिकेश भोसले, उमेश अग्निहोत्री, विशाल मगर, संदीप मस्के, प्रिया आसोडे, कपिल चंदुर, अक्षय मोरे आदींचा समावेश आहे.

थकबाकी दारांना पालिकेकडून अभय
खामगाव पालिकेच्यावतीने पालिका अंतर्गत येणाऱ्या कर थकबाकीदारांना सुविधा देत कर वसूलीचे मोहिम राबवली आहे. या थकबाकीदारांसाठी पालिकेच्यावतीने अभय योजने अंतर्गत लाभ प्रदान करण्यात आला आहे. यात २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल ४ कोटी ४१ लाख रुपये थकीत होते. त्यापैकी ४ कोटी ७ लाख रुपये थकबाकीदारांनी अदा केले. चालू आर्थिक वर्ष २०२५ – २०२६ मध्ये ८ कोटी ७१ लाख रुपये वसुलीचे लक्ष होते. त्यापैकी ८ कोटी ३९ लाख रुपये वसूल करण्यात आले.

 

इन साईड स्टोरी
शहरातील मालमत्ता कराच्या वसुलीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून शहरातील विकास कामे, गाव हिरवेगार व्हावे यासाठी वृक्षारोपण बरोबरच अनेक कामे केली जातात. या सोबतच याच कामावर विविध योजना राबविण्यासाठी मिळणारा निधी अवलंबून असतो, जो शासनाकडून उपलब्ध केला जातो. पालिकेतील कर्मचाऱ्यांची पगार, वार्षिक पगारवाढ ही या कर वसूलीवर अवलंबून असते. जास्तीत जास्त कर वसूल व्हावा यासाठी पालिकेच्यावतीने नागरिकांना काही सुट दिली जाते.

 

इनफरमेशन
जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतींनी केलेली कर वसुली व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे –
बुलढाणा – ६ कोटी ९४ लाख (८७.२४), चिखली – ५ कोटी ९० लाख (६५.५५), देऊळगाव राजा – १ कोटी ३२ लाख (८०.५४), सिंदखेड राजा – १ कोटी ३४ लाख (५६.७५), जळगाव जामोद – ६० लाख (७७), खामगाव – १२ कोटी ४६ लाख (९४.९३), लोणार – १ कोटी ३३ लाख (९२.०५), मलकापूर – ३ कोटी ३६ लाख (२५), मेहकर – ३ कोटी १७ लाख (८७.१३), मोताळा (नगरपंचायत) – १ कोटी २४ लाख (५६.३५), नांदुरा – ३ कोटी ४० लाख (६४.७२),संग्रामपूर (नगरपंचायत) – ३३ लाख (६१.७५), शेगाव – ४ कोटी (५८.२२)

एक्स्प्लेनर
नागरिकांना अधिकाअधिक सुविधा देणार
कर मोहिमेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता आम्ही या आधारावरच जास्तीत जास्त सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डॉ. प्रशांत शेळके, मुख्याधिकारी खामगाव नगरपालिका

00

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!