खळबळजनक! इन्स्टाग्रामवर बनावट नोटांचा ‘सेल’ उघडला

कमी पैशात जास्त नोटा देण्याचे आश्वासन; आरोपीस अटक

प्रतिनिधी | जळगाव जामोद
डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. जळगाव जामोद तालुक्यात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवर बनावट भारतीय चलनाच्या नोटांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाडी बुद्रुक येथील रहिवासी राहुल अनिल पवार याने ‘shankar_bhosale_’ या बनावट इन्स्टाग्राम हँडलद्वारे ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. “कमी पैशात जास्त नोटा मिळवा” असे आमिष दाखवून तो नागरिकांना बनावट नोटा चलणासाठी उपलब्ध करुन आर्थिक फसवणूक करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांच्या सायबर पाळतीमुळे त्याचा डाव उधळला गेला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकार यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात १ मार्च रोजी आरोपी राहुल पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.

मोठ्या रॅकेटची शक्यता
दरम्यान, आरोपी राहुल पवार याच्या या कृत्यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. त्याने यापूर्वी कोणाची आर्थिक फसवणूक केली आहे का, तसेच बनावट नोटांचे जाळे इतर जिल्ह्यांपर्यंत किंवा राज्याबाहेर पसरले आहे का, याचाही सखोल तपास केला जात आहे. सायबर माध्यमातून अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्या इतर संशयित व्यक्तींची माहितीही पोलिसांकडून गोळा करण्यात येत असून, या प्रकरणात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांनी आमिशाला बळी पडू नये
सोशल मीडियाचा वापर हा समाज जोडण्यासाठी व्हावा, गुन्हेगारीसाठी नव्हे. आरोपीने बनावट नोटांच्या विक्रीची जाहिरात करून कायद्याचे उल्लंघन केले असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. सायबर जगतातील प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
नितीनकुमार पाटील, ठाणेदार

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!