धामणगाव बढे येथे २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला
लालमाती रोडलगतच्या प्लॉटमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

मोताळा
तालुक्यातील धामणगाव बढे ते लालमाती रोडलगतच्या महेश घोती यांच्या प्लॉटमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वप्नील हरीदास अहेर वय २७, रा. धामणगाव बढे, ता. मोताळा असे मृतकाचे न ाव आहे. मृतक हा धामणगाव बढे ते लालमाती रोडलगत असलेल्या प्लॉटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. सकाळी या परिसरातून जात असलेले श्रीकृष्ण भागवत अहेर वय ३७, व्यवसाय भाजीपाला विक्री, रा. धामणगाव बढे यांना सदर युवक मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना या बाबतची माहिती दिली. घटने पश्चात पोलिसंानी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सदर युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून घटनेचा तपास करण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने बीट जमादार पोहेकॉ शैलेंद्रसिंह राजपूत यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
या प्रकरणी धामणगावबढे पाेलिसात मर्ग दाखल करण्यात आला.




