कोरडा दुष्काळ जाहीर करा’; लोणार तालुक्यात २२ गावांत रायमुलकरांची पीक पाहणी

लोणार 

गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने लोणार तालुक्यातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद तसेच फळबागांवर पावसाअभावी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील २२ गावांमधील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी केली. मेहकर-लोणार तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यापूर्वीच शासनाकडे केली असून, शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत ही मागणी रेटून धरू, असे रायमुलकर यांनी यावेळी सांगितले.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा पैसा तसेच कर्जाची रक्कम खर्च करून पेरणी केली. बियाणे, रासायनिक खते, मशागत आणि फवारण्यांवर मोठा खर्च झाला. मात्र पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळे पडून सुकत असून, कपाशी, तूर, मका आणि अन्य पिकांचीही अवस्था बिकट झाली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणे आणि शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार हा पीक पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पिकांची झालेली अवस्था सांगताना अनेक शेतकऱ्यांना भावनांना आवर घालता आला नाही. नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली.

यावेळी रायमुलकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, “या संकटात शेतकरी एकटा नाही. शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली. महायुती सरकारने यापूर्वीही शेतकऱ्यांना मदत केली असून, यावेळीही सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या गावांमध्ये झाली पाहणी

अंत्री देशमुख, मोहोतखेड, मातरखेड, गुधा, वेणी, बागुलखेड, गुंजखेड, जाफराबाद, दाभा, पाहूर, आरडव, वढव, कौलखेड, सोनुना, शिवनी जाट, गंधारी, सावरगाव मुंडे, रायगाव, नांद्रा, टिटवी, धाड आणि पांग्रा डोळे या गावांमध्ये पीक पाहणी करण्यात आली.

दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक दिलीपराव देशमुख, जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने, नीरज रायमुलकर, राजेश तांबिले, प्रल्हादराव सुलताने, सुनील सुलताने, विठ्ठल घायाळ, डॉ. प्रदीप मोरे, आबाराव हाडे, रमेश हाडे, अंकुश मुंडे, सदाशिव मुंडे, शिवाजी मोरे, भगवानराव कोकाटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!