बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही  : हर्षवर्धन  सपकाळ

अन्नदाता संघर्ष पदयात्रेची सांगता सभा 

जळगाव जामोद

काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही व दुसरीकडे शेती साहित्य महाग झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती ह्ल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रखरखत्या उन्हात सोमवार ४ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगुले, सरचिटणीस महेश गणगणे, ज्ञानेश्वर पाटील, शेगाव नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, मलकापूर नगराध्यक्ष अतिक जवारीवाले,  स्वाती वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, लक्ष्मण घुमरे, मंगलाताई पाटील, ज्योती ढोकणे, अॅड. अनंत वानखडे, तेजेंद्रसिंग चव्हाण, रशीद खान जमदार, मीरा मापारी, भूषण मापारी, डॉ. संतोष वानखेडे, संदीप शेळके, अॅड. भाऊराव भालेराव, प्रमोद पाटील, मोहतेशाम रजा, शैलेश खेडेकर, भगवान धांडे, प्रकाश शेगोकार, अतिक जवारीवाले, अंबादास बाठे, देवानंद पवार, हरिष रावळ, जावेद कुरेशी, धनंजय देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात होता आणि राहणार : हनुमंत पवार

कुठल्याही निवडणुका नसतांना काँग्रेस पक्ष रखरखत्या उन्हात ४५ अंश तापमान असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरला आहे. कारण फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांना वाचवण्यात कमालीचे अपयशी ठरले आहे. भारत – अमेरिका करारामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत. शेतकऱ्यांना वाचवता येत नसेल तर मुख्य़मंत्र्यांनी खुर्ची सोडावी. शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात होता आणि राहणार असा ठाम विश्वास काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या जातीत जन्म घेणे हा गुन्हा आहे का ? : राहुलभाऊ बोंद्रे

अमेरिका ट्रेड डीलमुळे देशातील शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्यांच्या सध्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करतांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी कवी किशोर बळींच्या ओळीचा आधार घेतला. “जाते जाते राबता राबता अखी जिंदगी मातीत..जणू जन्म घेणे गुन्हा शेतकऱ्यांच्या जातीत…” शेतकऱ्यांच्या जातीत जन्म घेणे, हा गुन्हा आहे, का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हर्षवर्धनदादा नावाचा काँग्रेसचा वाघ भाजपच्या विरोधात सातत्याने रणशिंग फुंकतो आहे त्यांच्या धैर्याचे, लढाऊ बाण्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी कौतूक करत भाजपच्या विरोधात तुम्ही आम्ही मिळून संघर्ष करु, असा एल्गारही फुकारला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!