संशयातून उसळलेला संताप; दौंडमध्ये पित्याने चिमुकलीची करवतीने कापून केली हत्या 

मनीष अग्रवाल | पुणे

 जिल्ह्यातील दौंड तालुक्यात  कुटुंबातील संशय आणि संतापाच्या भरात एका वडिलांकडून घडलेल्या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. केवळ ९ वर्षाच्या बालिकेची पित्याने इलेक्ट्रानिक करवतीने हत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आपल्या मुलगा संस्कारच्या शालेय गुणपत्रिकेबाबत कोणीतरी खाडाखोड केल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. याच संशयातून तो संतापाच्या भरात नियंत्रण गमावून बसला. रागाच्या भरात त्याने आपल्या ९ वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्या निष्पाप चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या या प्रयत्नात एका महिलेची साथ असल्याचाही संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी तिच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. तपास यंत्रणा घटनेच्या सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करत आहे.

या अमानवी घटनेमुळे समाजमन हादरले असून, कुटुंबातील तणाव, संशय आणि वाढत्या हिंसक प्रवृत्तींबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!