स्वरविहारच्या मंजुषा जाधव शास्त्रीय गायन विषयात उत्तीर्ण

बुलडाणा

 

जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथील सेवानिवृत्त जेष्ठ परिसेविका तथा स्वरविहार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी मंजुषा जाधव ह्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई द्वारा आयोजित प्रारंभिक परीक्षेत शास्त्रीय गायन विषयांमध्ये द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत.

जाधव यांनी ही परीक्षा केंद्र क्रमांक ८८७ वरील स्वरसाधना संगीत विद्यालय बुलडाणा येथून उत्तीर्ण केली आहे. सध्या त्या स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये नियमितपणे शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहे. मंजुषा जाधव यांनी आरोग्य सेवेत अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या प्रामाणिक रुग्णसेवेमुळे त्यांचा आरोग्य प्रशासनावर चांगलाच प्रभाव होता.

सेवानिवृत्ती नंतर त्यांनी संगीत कलेची आवड देखील जोपासली. या परीक्षेसाठी त्यांना स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे यांनी मार्गदर्शन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल आरोग्य तथा संपूर्ण संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे..

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!