लोणारात मध्यरात्री भरपावसात घरावर दारोडा, लाखो रुपयांचे साहित्य चोरी
ब्राह्मण वेटाळ परिसरात खळबळ!

लोणार
शहरातील ब्राह्मण वेटाळ परिसरातील बनमेरू यांच्या घराजवळील सुनील रामावत यांच्या घरी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत धाडसी व खळबळजनक चोरीची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या मुसळधार पावसामुळे घराजवळील जुने मोठे लिंबाचे झाड कोसळू शकते, अशी भीती असल्याने रामावत कुटुंब समोरील नवीन घरात झोपायला गेले होते. नेमका याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडले. घरातील कपाट, आलमारी, कोठ्या आणि सोफे यांची फोडतोड करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने, चांदी व नगदी रोकड लंपास केली. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली.
येथील रहिवासी सुनील नवरतमल रामावत यांचे ब्राह्मण वेटाळ भागात एक जुने व एक नवीन घर समोरासमोर आहे. कल दिवसभर शहरात व परिसरात अचानक हवा आणि पाऊस सुरू होते. रात्रीच्या वेळी पाऊस वाढला व हवा सुद्धा जास्त होती. यामुळे जुन्या घराजवळ लिंबाचे एक जुने मोठे झाड आहे. रात्रीच्या हवा-पावसामुळे हे जुने झाड घरावर कोसळू शकते, अशी भीती मनात असल्याने रामावत कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षेच्या कारणास्तव समोरील नवीन घरात झोपण्यासाठी गेले होते. घर पूर्ण लॉक होते, सर्व सामान जुन्याच घरात रामावत कुटुंबाचे होते त्या मध्ये सोने-नाणे, नगदी रोकड आणि इतर सर्व महत्त्वाचे घरगुती सामान,कागद पत्र जुन्याच घरात ठेवलेले होती. रात्री नवीन घरात झोपायला जाताना त्यांनी जुने घर पूर्णपणे लॉक (कुलूपबंद) केले होते. मात्र, रामावत कुटुंब झाडाच्या भीतीने समोरील घरात झोपल्याची आणि रात्रीच्या वेळी परिसरात शांतता असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला.कपाट, आलमारी, सोफे आणि डबे याची तोडफोड रात्री अंदाजे १ ते ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी जुन्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट, लोखंडी आलमारी, धान्याच्या कोठ्या, सोफे आणि डबे सताड उघडून संपूर्ण घराची उलथापालथ केली. कपाटात आणि डब्यांमध्ये लपवून ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि मोठी नगदी रोकड असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पुढील कार्यवाही लोणार पोलीस करीत आहेत




