रोहिणखेड शिवारात ५८ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

धामणगाव बढे
रोहिणखेड शिवारात ५८ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकाचे नाव सुरेश राजाराम राजस (वय ५८, रा. रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान रोहिणखेड शिवारातील स्वतःच्या शेतात त्यांनी चिंचेच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी मृतकाचे पुतणे सुरेंद्र रामदास राजस (वय ४६) यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यू क्रमांक २४/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची नोंद १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.२९ वाजता करण्यात आली. पुढील तपास ए. एस. आई गजानन पाटील करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




