प्राचीन दैत्यसूदन मंदिरात  श्री भगवान विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरणाच्या अभिषेकाने प्रारंभ झाला  किरणोत्सव  

प्राचीन दैत्यसूदन मंदिरात  श्री भगवान विष्णूच्या मूर्तीवर सूर्यकिरणाच्या अभिषेकाने प्रारंभ झाला  किरणोत्सव

लोणार  :  गोपाल तोष्णीवाल

जागतिक स्तरावर ख्याती प्राप्त असलेल्या लोणार सरोवरासह येथील अतिप्राचीन दैत्यसूदन मंदिरात १५ मे पासून किरणोत्सव महोत्सवाला प्रांरभ झाला.  या अद्वितीय सोहळ्याबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.

हजारो वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या मंदिराची वास्तुशैली आणि कोरीवकाम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, भगवान विष्णूच्या दैत्यसूदन अवताराला समर्पित असलेले हे मंदिर वर्षभर पर्यटक व भाविकांचे आकर्षण ठरते. या ऐतिहासिक मंदिरात दरवर्षी ठराविक दिवसांमध्ये सूर्यकिरण थेट मंदिरातील मूर्तीच्या चरणाला स्पर्श करतात.  दरम्यान, या पाच दिवसांत दुपारी साधारण ११ ते १ ह्या वेळेत मूर्तीवर पडणार असल्याने, त्या क्षणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी वर्दळ या वेळी निर्माण झाली होती.  या महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने   पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सोय तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.  त्याचबरोबर, गर्दीचे नियोजन, शिस्तबद्ध दर्शन व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्येयाचे दिसून आले.

देश-विदेशातून येणारे पर्यटक आणि भाविक या अद्भुत घटनेचा अनुभव घेण्यासाठी लोणारकडे आकर्षित होत आहेत. किरणोत्सवाच्या निमित्ताने लोणार शहरात धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार असून, हा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

(फोटो शैलेश सरदार लोणार)

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!