साध्वी सृष्टीलताजीचे शहरात आगमन महिलांनी बाईक रॅली काढुन केले स्वागत

बुलडाणा :-
सद्भावना सेवा समिती, बुलडाणा द्वारा दि. ०७ एप्रिल पासुन साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांची रामकथा आयोजित केली आहे. दुपारी २ ते ६ या वेळात साध्वी सृष्टीलताजी आपल्या अमृतमय वाणीतुन रामकथा प्रस्तुत करतील यासाठी अयोध्याधाम उत्तर प्रदेश येथुन साध्वीजीचे शहरात आगमन झाले आहे. याप्रसंगी दादावाडीमध्ये ए. आर. डी. देशलहरा परिवार यांनी साध्वीजीचे पुजन व माल्यार्पण करून स्वागत केले. सौ. अनिता देशलहारा यांनी साध्वी सृष्टीलताजी यांना मंदिर दर्शन घडविले. या प्रसंगी जैन साध्वी भगवंत परमपुज्य पुष्प दंताश्री म.सा.व.प.पु. कन्यारत्नश्री म.स. यांची उपस्थिती होती.
दादावाडी तर्फे घनश्याम चोपडा, ललित चोपडा उपस्थित होते. सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी साध्वी सृष्टीलताजीचे स्वागत केले त्यानंतर शहरातुन सौ. अंजली परांजपे यांच्या नेतृत्वात महिलांची स्कुटर रॅली व पुरुषांची बाईक रॅली सोबत साध्वीजी मार्बल हाऊसला आल्या सौ. सितादेवी शर्मा यांनी व परिवाराने पुजन करुन माल्यार्पण केले. तसेच यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे हे वर्ष सद्भावना सेवा समितीचे यशस्वी रित्या २५ वर्ष पुर्ण केल्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे आणि स‌द्भावना सेवा समितीचे अध्यक्ष यांच्या अमृतमहोत्सव असा दुग्धशर्करा योग आहे. या निमित्ताने ९ दिवस रामकथेवर आधारीत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुशा राहील. यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच आपल्या आयुष्यात एकदा तरी तुलादान करता यावे या पवित्र उद्देशाने तुलादान महादान उपक्रम राबविण्यात येणार आहे. अन्नदान, गोसेवा महापुण्याचे काम आहे आपण आपल्या वजना एंवढे गुळ, धान्य, साखर, गौग्रास दान करण्याची सुवर्ण संधी आहे. तुलादान मध्ये आलेल्या साहित्याचा सदोपयोग गोसेवा आणि रामकथेच्या महाप्रसादासाठी केल्या जाणार आहे. तरी या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, सचिव प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. रामकथेमध्ये सद्भावना सेवा समितीच्या बोधचिन्हाचे विमोचन करण्यात येणार आहे. उपक्रमाचे सयोजन ए. आर.डी. देशलहा परिवाराकडे आहे. तुलादान महादानमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होता यावे म्हणुन देणगी राशी गुळ ३० रुपये, साखर २० रुपये, धान्य १० रुपये व गौग्रास ५ रुपये प्रति किलो अशी नाममात्र तुलादान देणगी राशी ठेवण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी सद्भावना सेवा समितीचे चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टाणी, तिलोकचंद चांडक, सिध्दार्थ शर्मा, उमेश मुंदडा, सुभाष दर्डा, लाला माधवाणी, महिलांच्या बाईक रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या सौ. अंजली परांजपे विशेष परिश्रम घेत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!