अन्नातील विषबाधा मुळे दोन चिमकुल्या बहीण भावाचा मृत्यू

आई व मुलगी अत्यवस्थ
प्रतिनिधी | धाड,
अन्नातून विषबाधा झाल्याने भावंडांचा मृत्यू झाला तर आई व एक लहान मुलगी अत्यवस्थ झाल्याची घटना धाड येथे घडली. ही घटना ६ एप्रिल रोजी सकाळी घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
येथील रहिवासी असलेले जमदार कुटुंबातील मोहंमद वसीम जमादार वय 4 वर्षे, मशीरा मोहंमद जमादार वय 7 वर्ष या दोन बहीण भावाचा मृत्यू झाला तर त्यांची आई अफरिन महमंद वसीम वय 34, मुलगी फातिमा म वसीम वय 8 वर्ष यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरातील लोकांना 4 एप्रिल पासून मळमळ होत असल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र या ठिकाणी आज सकाळी 6 एप्रिल रोजी मुलगा व मुलगीचा मृत्यू झाला



