लोणार  येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने  सरकारचा नोंदवण्यात आला  निषेध

दरवाढ नियंत्रणात आणा अन्यथा तीव्र आंदोलन 

 

लोणार

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्यथा तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 25 मे 2026 रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता लोणार तहसीलचे नायब तहसीलदार परडीकर मॅडम यांना लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके व काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे,माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उपनगराध्यक्ष आबेद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले
केंद्र सरकार चे लक्ष देशात दिवसे दिवस इंधन दरामध्ये होणारी वाढ, व पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडर अपुरा पुरवठा याला जबाबदार असणारे केंद्र सरकार तथा राज्य सरकारचे उदासीन धोरणामुळे दि.25/05/2026 रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार च्या विरोधात तीव्र आंदोलन करुन इंधन दरवाढी वरील नियंत्रण व योग्य पुरवठा करण्यात यावा याकरीता शासनाने सदर बाबीकडे लक्ष देण्यासाठी व तसेच शेतक-यांच्या शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या डिझेलचा लोणार शहरात मोठा तुटवडा निर्माण झालेला असुन सर्व पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. शेतीचे पेरणीपुर्व हंगामी कामे सुरु असतांना टॅक्ट्रर, पंप, शेती यंत्रसामग्री यासाठी लागणारे डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत लोणार तहसिलदार यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब, बुलडाणा, यांना देण्यात आले लोणार तालुक्यात पुरेशा पेट्रोल व डिझेल घरगुती गॅस सिलेंडर कोठा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा व केलेली दरवाढ तात्काळ रदद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन लोणार कॉग्रेस कमेटीच्या वतीन करण्यात येईल.
यावेळी लोणार नगरपालिकेचे नगरसेवक पंढरी भाऊ साठे, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नगरसेवक अरुण जावळे, नियोजन सभापती साहेबराव पवार, मी नगरसेवक शेख रउफ भाई, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अंबादास इंगळे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, युवा काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, एजाज खान, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सकाराम पवार,
इमरान खान, वकार कुरेशी सर,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष मोहसीन शहा,भवानी मापारी, करीम शाह, दीपक मानवतकर, विलास लहाने, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!