१८० अल्पवयीन मुलीचे ३८० अश्लील व्हिडीओ केले वायरल

नाशिक पाठोपाठ अमरावती ही हादरली

प्रतिनिधी | अमरावती

 

नाशिक मध्ये भोंदूबाबा अशोक खरात याचे रोजच काही  ना काही कारनामे समोर येत असल्याने नाशिक सारखी पवित्र भूमी हादरली होती. आता या प्रकरणा पाठोपाठ अमरावती येथे १८० अल्पवयीन मुलीचे ३९० अश्लील व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मोठी टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात असून शेकडो मुलींना ब्लकमेल केले जात असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी  एका आरोपीला १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ व्हायरल  होत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संशयितांनी तरुणी आणि अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने अश्लील कृत्ये करायला लावली. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे.  या घटनेमुळे राज्यभरात  संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात  खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सुमारे १८० मुली या रॅकेटमध्ये अडकल्या असण्याची शक्यता असून त्यापैकी अनेक अल्पवयीन आहेत. हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून मोठ्या षडयंत्राचा भाग असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी  डॉ. अनील बोडे व अचलपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेवून या प्रकरणाचा सखोल तपास करुन या मागे असलेल्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!