पुसद येथील बंजारा ट्रवल्स समृध्दीवर पलटली; एक ठार, १७ जखमी
बस चालवतांना चालक काढत होता रिल

प्रतिनिधी । बुलडाणा
पनवेल येथून पुसदला जाणारी बंजारा ट्रवल्सचा चालक वाहन चालवतांना मोबाईलवर रिल काढत असताना अचानक बसवरील ताबा सुटल्यामुळे लक्झरी बस पलटी होऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकल्या पियुष यशपाल राठोड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक 17 जखमी झाले आहेत. ही घटना समृध्दी महामार्गावरील टोल प्लाझा, मेहकर नजीक आज सकाळी 5.30 वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथून पुसद कडे बंजारा ट्रवल्स क्रमांक MH 29 BE 2333 ही लक्झरी बस जात होती. सकाळच्या सुमारास या बस वरील चालक बदलण्यात आला नवीन चालक येताच त्याने भरधाव वेगाने वाहनच दामटण्यास सुरुवात केली’ गाणी वाजवण्यास सुरुवात केली यावेळी कॅबिन मध्ये बसलेल्या नागरिकांनी त्याला असे करण्यास विरोध केला, परंतू याकडे चालकाने लक्ष दिले नाही दरम्यान मेहकर पासून काही अंतरावर बस चालवत असतांना चालकाने हातात मोबाइल घेवून व्हिडीओ रिल बनवण्यास सुरुवात केली यावेळी त्याचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली आणि MH 40 ED 1348 क्रमांकाच्या कारला धडकली. कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांना मुका मार लागला असून बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत.
अपघातानंतर समृद्धी टोल नाका, मेहकर येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी बसमध्ये घुसून जखमींना बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
जखमींची नावे
वैभव धुळे
शांती जाधव
विजय राठोड
किरण यशपाल राठोड
आशा देवकर
किशन चव्हाण
मैफूज अहमद
अस्वद अहमद (हात मोडलेला)
उमीहाणी अहमद (लहान मुलगी)
सुशील खडसे (पाय मोडलेला)
रूपचंद गजानन बावनकुळे (मुका मार)
योगिता रूपचंद बावनकुळे
अविनाश राठोड
राजेश चव्हाण
लवकित चव्हाण
पूजा राठोड
ध्रुवी राठोड (लहान मुलगी)



