मोदींना राष्ट्रीय आजार जडलाय ; खासदार संजय राऊत

प्रतिनिधी | मुंबई

नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन  करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची गो हत्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. ते विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले आहे. त्यानंतर तुम्ही राष्ट्राला संबोधित सुद्धा केले होते ते भाषण ऐका. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट बघा. 2023 ला मंजूर झालेले विधेयक अमलात आणले नाही म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. खोटे अश्रू पाहून देशातील जनता आता फसणार नाही. एक विधेयक मंजूर झाले नाही हे काही राष्ट्रावर संकट नाही तर भाजपवर संकट आहे. त्यांच्या पक्षावरील संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणे योग्य नाही. तुमच्यासाठी देशाचे माध्यमे वापरणे अगदी चुकीचे आहे. 2023 मध्ये संसदेत काय झाले हे एकदा तपासले पाहिजे.

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश कायम पेटवायचा होता. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी काय खावे हे मुद्दे निर्माण करतात. पण त्यांना कधी असे काही वाटत नाही काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातील महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही, तुम्ही हे खोटे धंदे बंद करा. आम्ही सर्वांनी मिळून या बिलाचा पराभव केला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!