खळबळजणक! आता २८ देशांना नव्या वायरसचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

मुंबई,

 जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने हंता वायरसबाबत तातडीचा इशारा दिला असून, एका क्रूझ जहाजावर आढळलेल्या संसर्गामुळे अनेक देश सतर्क झाले आहेत. सुरुवातीला १२ देशांबाबत खबरदारीचा इशारा देण्यात आला होता, मात्र प्रवाशांचा विविध देशांशी संपर्क आल्याने आता तब्बल २८ देशांपर्यंत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या “MV Hondius” या क्रूझ जहाजावर हंता वायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत अनेक संशयित रुग्ण आढळले असून काही मृत्यूही नोंदविण्यात आले आहेत. या जहाजावर विविध देशांतील प्रवासी असल्याने जागतिक पातळीवर संपर्क शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हंता वायरस प्रामुख्याने उंदीर आणि इतर कृंतक प्राण्यांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेमुळे पसरतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये वायरस या प्रकारात माणसातून माणसात संसर्ग होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संस्थेने स्पष्ट केले आहे. मात्र हा कोरोना सारखा वेगाने पसरणारा विषाणू नसल्याचेही संघटनेने नमूद केले आहे.

या आजाराची सुरुवात ताप, अंगदुखी, थकवा आणि श्वसनास त्रास अशा लक्षणांनी होते. गंभीर स्थितीत न्यूमोनिया आणि फुफ्फुस निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थेने सध्या सामान्य नागरिकांसाठी धोका “कमी” असल्याचे सांगितले असले तरी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!