एका गावाने दुसऱ्या गावाला वेढा दिला; एक एकाला ठोकून काढले

गुजरात येथील थराद तालुक्यातील घटना

प्रतिनिधी | गुजरात

दोन समाजात सुरु असलेली तेढ निवळवण्यासाठी गावात चौधरी समाजाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तेढ निवळण्या येवजी उपस्थित प्रचंड आक्रमक झाले, आपल्या समाजातील मुलीची घर वापसी करण्याच्या कारणावरुन सदर समाजाने उण नामक गावाला वेढले. यावेळी लाठी काठीने चौधरी समाजातील लोकांनी दुसऱ्या समाजाच्या लोकांना घेरुन घेरुन मारल्याची घटना समोर आली. सदर मारहाणीत हजारो नागरिक होते ज्यांनी गावातील गाडया, घरे, दुचाकी, दुकानांची तोडफोड केली.

उन या गावातील रबारी समाजाच्या एका युवकाने अंजना चौधरी या राजस्थान मधील जमातीच्या एका मुलीशी आंतरजातीय विवाह केला. या विवाहाला आता दोन वर्षाचा कालावाधी झाला आहे. त्या पश्चात अंजना चौधरी समाजाच्यावतीने रबारी समाजाचा राग केला जातो आहे. आपल्या मुलीची घर वापसी करायची हा हटट सदर समाजाने घेतल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

 

अशी आहे घटना

थराद तालुक्यातील रुणी गावातील कंकू चौधरीने सुमारे दोन वर्षांपूर्वी ऊण गावाच्या महादेव रबारीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघांचे जीवन आनंदाने सुरू आहे आणि त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, आता चौधरी समाज कंकू चौधरीला घरी परत आणण्यावर ठाम आहे. याच संदर्भात चौधरी समाजाचे महासंमेलन झाले होते. चौधरी समाजाचे अध्यक्ष रजनेश चौधरी यांनी सांगितले की, हा मुद्दा समाजाच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. त्यांनी पुढील पाच दिवसांत रबारी समाजाच्या नेत्यांशी बोलून मुलीला परत आणण्याची जबाबदारी घेतली आहे. जर मुलगी पाच दिवसांच्या आत परत आली नाही, तर पुढील रणनीती नंतर ठरवली जाईल. सध्या तरुणांमध्ये संताप आहे, समाजाचे नेते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!