संजूभाऊ होणार खासदार?

महाराष्ट्रात होणार 72 खासदार

 

दिनेश मुडे, बुलडाणा
मागील काही वर्षापासून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाभर हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. हे गणित मुद्दाम नव्हे, ही त्यांची रणनीती होती हे, समिकरण आता समोर येत आहे. जिल्ह्यात होणाऱ्या नवीन बदलानुसार जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड लोकसभेच्या तयारीला लागल्याचा पक्का तर्क आमचा आहे.
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आक्रमक आमदार संजय गायकवाड हे कायम कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत राहतात. त्यांचे राजकारण कधीच कुणाल कळत नाही. मागील लोकसभेच्या दरम्यान त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला होता तेव्हा त्यांनी खळबळ उडवून दिली हाेती. नव्हे वातावरण निर्मिती तयार करण्यास सुरुवात केली होती. त्याचे कारण म्हणजे वर्ष २०२९ मध्ये होणारे राजकिय बदल हे होते. याची भनक आमदार संजय गायकवाड यांना आधीच लागली होती. तेव्हा पासून ते गुप्त अवस्थेत हालचाली सुरु केल्या होत्या. मध्यंतरी जिल्हयातील राजकारणात अशी चर्चा होती की, आमदार संजय गायकवाड हे खासदार प्रतापराव जाधव यांची जागा बळकावण्याच्या प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यात ही तसेच वातावरण निर्माण होत होते, व चर्चा ही होती मात्र असे झाले तरीही आतील बात आमदार गायकवाड यांनी कधीच कुणा समोर काढली नाही. सदर विषयाची गुप्ततेची वाच्यता कुठेही केली नाही.
दुसरीकडे आता देशातील लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेबाबत प्रशासकिय स्तरावर हालचालीला वेग आल्याची माहिती आहे. यात आधी जनजगणनेची पूर्तता केली जाणार आहे. नंतर जनगणनेच्या आधारावर लोकसभेची पुनर्रचना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ जाहिर केले जाणार आहे. या दोन्ही लोकसभा मतदार संघात एक, एक विधानसभा मतदार संघ वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात जिल्ह्याची विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. ही विभागणी खामगाव व बुलडाणा अशी होवू शकते. मागील अनेक वर्षापासून खामगाव हा स्वतंत्र जिल्हा जाहिर करण्यात यावा अशी मागणी होत आहे. ही मागणी या स्वरुपात पुर्ण होण्याचे संकेत आहे. तथापि जिल्ह्याचे दोन लोकसभा मतदार संघ तयार झाल्यास साहजिकच लोकसभेसाठी संजूभाऊ पेक्षा जास्त प्रभावी उमेदवार मिळणे अवघड आहे. त्यामुळे आतापासूनच संजूभाऊ तयारीला लागण्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात होणार ७२ खासदार
केंद्रसरकार ने लोकसभेतील खासदाराची संख्या ५४३ वरुन ८५० पर्यत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे विधेयक लवकरच लागू केल जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ४८ खासदार लोकसभेत जातात. या विधेयकानंतर महाराष्ट्रातील खासदारांची संख्या तब्बल ७२ एवढी होणार आहे. हे गणित पुढील लोकसभा निवडणूकी पर्यत लागू होण्याची शक्यता असल्याने संजूभाऊ समर्थकात उत्साहाचे वातावरण आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!