उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम जयंती
आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते भगवान परशुराम भवनाचे लोकार्पण

बुलडाण्यात उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम जयंती
आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते भगवान परशुराम भवनाचे लोकार्पण
प्रतिनिधी | बुलडाणा,
भगवान परशुराम जयंती निमित्त सकल ब्राम्हण समाजाच्यावतीने शहरातून बाइक रॅली काढण्यात आली. त्यानंतर शहरातील महाविर नगर येथे उभारण्यात आलेल्या भगवान परशुराम भवनाचे लोकार्पण आमदार संजय गायकवाड व सुविद्य पत्नी तथा बुलढाणा नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम सकाळी १० वाजेच्या दरम्यान पार पडला.
दरम्यान सकाळी भगवान परशुराम जयंती निमित्त सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोटर सायकल रॅली सकाळी ७.३० वाजता स्थानिक राम मंदिर येथून प्रारंभ करण्यात आली. ही मोटरसायकल रॅली कारंजा चौक, तहसील चौक, बाजीप्रभू देशपांडे स्मारक, भगवान परशुराम चौक, गजानन महाराज मंदिर चौक, चिंचोले चौक, सर्क्युलर रोड मार्गे महावीर नगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भगवान परशुराम भवन या ठिकाणी पोहचल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर भगवान परशुराम भवनाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक नगरपालिका गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक मालती शेवाळे, बाळासाहेब धूड, सोहम झाल्टे, उदय देशपांडे, नीलम खोत, भाजपा माजी शहर प्रमुख सिद्धार्थ शर्मा, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मयुरी देशपांडे, आश्रुबा शेवाळे, जी. टी. कुलकर्णी, अमित कुलकर्णी, उत्कर्ष ढापणे आदी उपस्थित होेते. त्यानंतर समाज बांधवांच्या वतीने आ. गायकवाड तसेच बुलढाणा नगराध्यक्ष पुजा संजय गायकवाड यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. सुभाष जोशी, अंजलीताई परांजपे, मेघनाताई पेठे, अजिंक्य कुलकर्णी, किरण देशपांडे, विनायक जोशी, बाबा वरणगावकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रदीप कवीमंडन, विलासराव देशमुख, अशोक व्यास, संजय कुलकर्णी, अमित काळकर, गजानन कुलकर्णी, अजय काळे,आदी उपस्थित होते.
प्रेरणेसाठी सामाजिक भवनाची उभारणी आवश्यक – आ. संजय गायकवाड
भवन लोकार्पण दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित समाजाला मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजाच्या एकतेसाठी, सांस्कृतिक जतनासाठी व पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक व सामाजिक भवनांची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. भगवान परशुराम यांच्या कार्यातून समाजाला सदैव प्रेरणा मिळत राहील असे ही ते म्हणाले.




