खामगावात वेगाचा कहर; भरधाव कारने सुरक्षारक्षकांना ३० फुटांपर्यंत फरफटत चिरडले

खामगाव
शहरातील नांदुरा रोडवरील हॉटेल पुष्पांजली समोर कर्तव्यावर असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची भीषण घटना १४ मे च्या मध्य रात्री १.३० वाजता घडली. या अपघातात कारने दोघांना तब्बल ३० फुटांपर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास कार एम.एच. १५ जी.एफ. ८0७३ क्रमांकाची कार शहरातून नांदुरा रोडकडे भरधाव वेगाने जात होती. यावेळी हॉटेल पुष्पांजली समोर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षक गोविंद शेगोकार व विवेक पायघणे यांना सदर कारच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, दोघेही सुरक्षारक्षक कारसोबत सुमारे २५ ते ३० फुटांपर्यंत फरफटत गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रकरणी शहर पोलिसात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!