लोणारच्या ऐतिहासिक ‘झोपलेला मारुती’ मंदिरात धार्मिक कार्यक्रम आज

शनि जन्मोत्सव व शनि अमावस्या सोहळा निमित्त कार्यक्रम

प्रतिनिधी | लोणार
येथील जागतिक कीर्तीच्या लोणार नगरीचे ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असलेल्या हनुमान मंदिर संस्थान (झोपलेला मारुती परिसर) येथे शनिवार, १६ मे रोजी वैशाख अमावस्येनिमित्त भव्य ‘शनि जन्मोत्सव’ व ‘शनि अमावस्या’ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणार येथील हे मंदिर संपूर्ण भारतातील एक अत्यंत अद्वितीय आणि दुर्मिळ पावन स्थान मानले जाते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, येथे निद्रावस्थेतील संकटमोचन प्रभू हनुमानासोबतच शनिदेव आणि त्यांच्या पत्नीचे देखील एकत्रित दर्शन घडते. संपूर्ण देशात शनिदेव त्यांच्या पत्नीसह विराजमान असलेले हे एकमेव मंदिर असल्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हनुमान मंदिर संस्थानच्या वतीने लोणार शहर तसेच परिसरातील सर्व आबालवृद्ध भाविक भक्तांना या मंगलमय सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे कार्यक्रमाची रुपरेषा
शनिवार, १६ मे रोजी महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी ७:०० वाजता शनिदेव, त्यांच्या पत्नी आणि प्रभू हनुमानाचा विशेष अभिषेक व पूजन. दुपारी १२:०० वाजता मुख्य ‘शनि जन्मोत्सव सोहळा’ आणि मध्यान्ह महाआरती. दुपारी १२:०० ते सायं ४:०० वा. सर्व भाविकांसाठी अखंड भंडारा व महाप्रसादाचे वितरण. सायंकाळी ६:०० वाजता महाआरती व सामूहिक हनुमान चालीसा पठण.

दर्शनाचे धार्मिक महत्त्व:
शनि जयंती आणि शनी अमावस्येच्या या दुर्मिळ योगावर शनिदेव आणि त्यांच्या पत्नीचे एकत्रित दर्शन घेतल्याने कौटुंबिक सौख्य लाभते, वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, सुख-समृद्धी मिळते आणि साडेसाती व इतर ग्रहपीडांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!