यवतमाळ मध्ये फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून

यवतमाळ,

शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसर  वाहन फायनान्सच्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात सचिन उर्फ येडा राठोड या तरुणाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवार २२ मे रोजी सकाळी घडली.

मृत सचिन राठोड हा जामनकर नगर परिसरातील रहिवासी असून, शहरातील एका फायनान्स कंपनीसाठी जप्त वाहने ताब्यात घेण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहारातून त्याचा काही जणांशी वाद झाला होता. दरम्यान, दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाल्याची चर्चा होती. मात्र, जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने गुरुवारी पहाटे हल्ल्याची घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सचिनवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या वेळी त्याला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या दोन मित्रांवरही वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सचिनने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. काही वेळाने तो हनुमान मंदिर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळून आला. मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांच्या डिबी पथकाने वेगाने हालचाली करत मुख्य आरोपी बकुल उर्फ शेख शाहीद शेख रफीक याला अटक केली. तसेच या प्रकरणात संशयित म्हणून आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!