महिला आरोपीने घराला आतुन कुलूप लावले, मग चिरला विवाहितेचा गळा

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

रागावलेल्या प्रेयसीने घरात प्रवेश करताच आतून कुलूप लावले, मग पिस्तुल काढले, हे पिस्तुल हिसकावल्यावर घरातील लोकांच्या डोळयात स्प्रे मारला, मग चाकूने विवाहितेचा गळा चिरून पळून गेली. ही घटना  वाळूज परिसरात २३ एप्रिल रोजी सकाळी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेलया माहितीनुसार महेंद्र सोनपेठकर हे वाळूज भागात उद्योग चालवतात. काही वर्षापूर्वी शैला  नामक महिलेची व त्यांची एका कंपनीत ओळख झाली होती. कालांतराने दोघात प्रेमप्रकरण चालले.  यावेळी  आरोपी शैलाने महेंद्रला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आतापर्यंत 36 लाख उकळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. महिनाभरापूर्वी शैला जबरदस्तीने महेंद्रच्या घरी राहायला आली, तेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढले होते.

हत्येनंतर शैला एक तास घरातच होती. तिने बाथरूममध्ये रक्ताने माखलेले हात आणि चाकू धुतला. काही घडलेच नाही अशा थाटात ती फोनवर बोलत बसली. केशरबाईंच्या ओरडण्यामुळे नागरिक जमा झाले. पोलिस येणार असल्याचे समजताच शैलाने फाशी घेण्याचा बनाव रचला. पोलिसांनी सब्बलच्या साह्याने दरवाजा तोडला आणि शैलाला ताब्यात घेतले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!