मान्सून पुढे सरकरणार ; महाराष्ट्रावर चक्रीवादळ सक्रीय

मुंबई,

तेलंगना मध्ये रखडलेला मान्सून आता २३ जून पासून पुढे सरकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रावर चक्रीवादळ सक्रीय झाले आहे, जे मान्सूनसाठी उपयुक्त मानले जात आहे. या आधारे मान्सून २३ जून दरम्यान महाराष्ट्रासह  ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात पोहणार असल्याची माहिती आहे.

या चक्रीवादळामुळे  मान्सूनचे ढग उत्तर भारताकडे ओढले जाण्याची शक्यता आहे. मान्सूनने १५ दिवसांत १९ राज्यांत धडक दिली असली, तरी ८ जूनपासून तो तेलंगणामध्येच थांबला होता. गेल्या २४ तासांत बिहारमधील वैशाली येथे सहा आणि झारखंडमध्ये आठ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. राजस्थानमधील १२ जिल्ह्यांसाठी वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण झालेली असूनही उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह आठ राज्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे.

हवामान विभागाच्या मते, जेट स्ट्रीमचा सध्याचा पॅटर्न कमकुवत झाल्यावर मान्सूनचे वारे वेगाने वाहतील. पुढील 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड आणि इतर भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. जेट स्ट्रीम वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये वाहणारे खूप वेगाने वारे आहेत. हे साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 8 ते 15 किलोमीटर उंचीवर असतात. हे मान्सूनच्या ढगांना आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच पश्चिमी विक्षोभाला प्रभावित करतात.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!