कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक: कारमधील 11 जण जागीच ठार

प्रतिनिधी | मुंबई

कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये ८ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!