पुण्यगृप च्यावतीने वृद्धाश्रमाला दिला मदतीचा हात

प्रतिनिधी | बुलडाणा,
येथील पुण्य गृपच्यावतीने शहरातील वृध्दाश्रमाला मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली. सदर मदत नुकतेच चांडक ले आउट भागातील लेक लाडली वृद्धाश्रम येथे देण्यात आली.
शहरातील विविध भागातील नागरिकांनी एकत्रित येवून गरजूंना हातभार लावण्यासाठी पुण्य गृपची स्थापना करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून सदर गृप शहरात कार्यरत आहे. शहरातील चांडक ले आउट भागातील लेक लाडकी वृध्दाश्रमला मदतीची गरज असल्याची माहिती सदर गृपला मिळाली. या माहितीच्या आधारे गृपच्यावतीने जिवनावश्यक वस्तू सह, किराणा साहित्य वृद्धाश्रमाला प्रदान केले. याशिवाय दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने व्हीलचेअर, प्लास्टिकचे आवश्यक साहित्य व इतर वस्तु ही प्रदान केल्या. दरम्यान यावेळी शहरात अशी अनेक गरजू मंडळी आहे, त्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पुण्यगृपच्यावतीने करण्यात आले.
यावेळी गृपचे सदस्य निखिल जालान, रितेश खडके, सोहेल बुधवानी, अक्षय देशलहरा, अभिषेक चोपडा व आनंद माधवानी आदी उपस्थित होते.




