वढव गावात मध्यरात्री भीषण आग; ७ शेतकऱ्यांचे संसार राख

🔥🔥🔥🔥 BIG NEWS

लोणार | प्रतिनिधी
तालुक्यातील वढव गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाली. या आगीत काही क्षणांतच ६ ते ७ शेतकऱ्यांची घरे ज्वाळांमध्ये भस्मसात झाली. ही घटना २८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार वढव येथे मंगळवारी मध्यरा़त्रीच्या दरम्यान गावातील वस्तीत अचानक आग लागली. उन्हामुळे रात्रीचे वातावरण ही दमट असल्याने लागलेली आग लगेच सर्वत्र पसरली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत अनेक शेतकऱ्यांची घरे भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे हे रात्री सुमारे दीड वाजता घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत मेहकर व लोणार येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ बोलावण्यात आल्या. अथक प्रयत्नांनंतर पहाटे चारच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार भूषण पाटील, अ‍ॅड. आकाश गोडे, आदींनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!