बच्चू कडूंनी दिव्यांगाच्या विकासासाठी हातात घेतला धनुष्य ; शिवसेनेत प्रवेश

 शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू ; बच्चू कडू

मुंबई  | प्रतिनिधी

 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बच्चू कडू यांच्यासोबत प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. दरम्यान शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाआहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी आज दिली.

    यावेळी त्यांनी   शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. शिंदेच्या नेतृत्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहिले असेल, तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना काय राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणारा आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी निक्षूण सांगितले.   यावेळी बच्चू कडू म्हणाले की, २४ तासात एकनाश शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, ते होत असेल तर काय? संघटना या काळात चालवणे फार कठिण आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणे माझे काम आहे. जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचे आहे, त्यासाठी प्रहार राहील.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!