नशामुक्ती समूहगायन स्पर्धेत स्वरविहार संगीत विद्यालयाला द्वितीय क्रमांक

बुलढाणा

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या वतीने, माय भारत बुलढाणा आणि राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने “नशा मुक्त युवा विकसित भारत” या अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय समूहगायन स्पर्धेत स्वरविहार संगीत विद्यालयाच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकाविला.

राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या या स्पर्धेचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे हा होता. भारत सरकारच्या “नशा मुक्त युवा विकसित भारत २०२६” या संकल्पनेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये समूहगायन, समूहनृत्य, चित्रकला आदी स्पर्धांचाही समावेश आहे.

समूहगायन स्पर्धेत स्वरविहार संगीत विद्यालयाच्या अभय झनके, शंतनू सरदार, हर्षल तायडे, सुमित गवई आणि तेजस इंगोले यांनी “सोडून दे दारू, करू नको संसाराची हाल” हे व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देणारे गीत सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांनी पसंती देत द्वितीय क्रमांक जाहीर केला.

स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार जिल्हा युवा अधिकारी दीक्षा पोमन, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन, उपप्राचार्य डॉ. प्रकाश केंद्रे आणि राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. रोहित सालकुटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.

स्पर्धेसाठी स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!