नामदार साहेब, मेहकर पाठोपाठ जरा लोणारकडे ही बघा!

लोणाार बसस्थानकावर मूलभूत सुविधांचा बोजवारा!

 

 

लोणार :

बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या मेहकर येथील अद्ययावत व नूतनीकरण केलेल्या नवीन बसस्थानकाचे उद्घाटन अखेर राज्याचे परिवहन मंत्री ⁠प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होत आहे.  गेली कित्येक वर्षे रखडलेल्या ⁠मेहकर बसस्थानकाच्या बांधकामामुळे प्रवासी त्रस्त होते, आता हा प्रश्न सुटल्याने मेहकरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मेहकर आगाराच्याच नियंत्रणात असलेल्या जागतिक कीर्तीच्या लोणार बसस्थानकाला मंत्र्यांचा न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल लोणार परिसरातील नागरिक विचारत आहेत.

नवीन इमारत, प्रवाशांसाठी आधुनिक सोयी-सुविधा आणि सुसज्ज फलाटांसह मेहकरचे बसस्थानक आता प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. लोणार बसस्थानक हे मेहकर आगाराच्याच अंतर्गत येते. परंतु, मुख्य केंद्र चकाचक होत असताना, जागतिक पर्यटन क्षेत्र असलेल्या लोणारमधील मुख्य बसस्थानक मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी चाचपडत आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त लोणारकरांच्या प्रमुख मागण्या

मेहकरच्या उद्घाटनासाठी विदर्भात येत असलेल्या परिवहन मंत्र्यांनी लोणार बसस्थानकातील खालील गंभीर समस्यांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे:  राज्यभरात सुरु असलेल्या ‘स्वच्छ बसस्थानक’ अभियानांतर्गत लोणार येथील साचलेले कचऱ्याचे ढीग आणि शौचालयांची तातडीने दुरूस्ती करावी,  गेल्या काही काळात लोणारवरून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने सुरू करून प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अवैध वाहतुकीचा विळखा तोडा स्थानक परिसरातील अवैध वाहनांवर कडक कारवाईची मोहीम राबवावी,

 

मंत्र्यांनी लोणारला भेट देण्याची मागणी

मेहकर येथील नवीन बसस्थानकाचे उद्घाटन होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, राज्याचे परिवहन मंत्री महोदयांनी मेहकरच्या पाठोपाठ अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या जागतिक वारसा स्थळ लोणार बसस्थानकालाही एक ‘सरप्राईज व्हिजिट’ (अचानक भेट) द्यावी, जेणेकरून येथील प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळतील,” अशी आग्रही मागणी स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!