भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार जितेंद्र शेळके ठार

 

प्रतिनिधी | नाशिक

शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ जितेंद्र शेळके व भोंदू खरात प्रकरणातील एक महत्वावा दुआ असलेल्यांचा समृध्दी महामार्गावर अपघातील मृत्यु झाला. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली.

       जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू अपघात की घातपात? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके शुक्रवार १७ एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

मृत जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचा अत्यंत जवळचा सहकारी होते. ते खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास 4 वेळा चौकशी झाली होती. त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यामु्ळे शेळके प्रचंड तणावात होते. त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की, घातपात आहे? याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!