आर वैशालीने रचला इतिहास; ठरली पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू

प्रतिनिधी | दिल्ली

बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाची बहीण आर वैशाली हिने सध्या सुरू असलेल्या फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वैशालीने विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे.

चेन्नईच्या २४ वर्षीय वैशालीने बुधवारी पार पडलेल्या अखेरच्या १४व्या फेरीमध्ये रशियाच्या कॅटरीना लॅगनो हिला पराभूत करीत ८.५ गुणांची कमाई केली. हे जेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू ठरली असून, तिने जागतिक अजिंक्यपद (वर्ल्ड चॅम्पियनशिप) स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे.  जागतिक चॅम्पियनशिपच्या लढतीसाठी गेल्या १५ वर्षांत ती पात्र ठरणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या यशाने भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णयुगाची पुन्हा सुरुवात झाली आहे.

या निकालामुळे बुद्धिबळाच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच एखादी भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या किताबासाठी लढणार आहे. तिच्याआधी कोनेरू हम्पीने २०११ मध्ये अल्बेनियातील तिराना येथे हौ यिफानविरुद्ध महिलांच्या किताबासाठी आव्हान दिलं होतं. कोनेरू हम्पीनंतर आता आर वैशाली गेल्या १५ वर्षांत ही कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरली. आता भारताची ८४ वी ग्रँडमास्टर वैशाली आणि चीनची जू वेनजुन यांच्यातील हा महामुकाबला या वर्षाच्या अखेरीस पार पडेल. बुद्धिबळ प्रेमी आतापासूनच या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!