आता H-1 B व्हिसावर 3 वर्षांच्या बंदीची तयारी

वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांच्या पक्षाच्या खासदारांनी एच-1 बी व्हिसावर 3 वर्षांपर्यंत बंदी घालण्यासह अनेक कठोर तरतुदी असलेले विधेयक संसदेत सादर केले आहे. सदर विधेयक लवकरच मंजूर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या तीन वर्षात एचवन बी व्हिसावर बंदी राहणार असल्याची चर्चा आहे.

  रिपब्लिकन खासदारांनी काँग्रेस (संसद) मध्ये सादर केलेल्या या एच-1 बी गैरवापर प्रतिबंधक विधेयक-2026 चा उद्देश अमेरिकन लोकांसाठी नोकरीच्या अधिक संधी निर्माण करणे हा आहे. ॲरिझोनाचे रिपब्लिकन खासदार एली क्रेन यांनी हे विधेयक संसदेत मांडले आहे.  या विधेयकावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर खासदारांमध्ये ब्रँडन गिल, पॉल गोसर आणि अँडी ओगल्स यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हिताशी संबंधित या विधेयकाला डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही खासदारांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, 100 खासदारांच्या सिनेटमध्ये 60 खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस मतदान होण्याची शक्यता आहे. या विधेयकामुळे सर्वाधिक भारतीय प्रभावित होतील. कारण, अमेरिकेत दरवर्षी जारी होणाऱ्या सुमारे 85 हजार एच-1 बी व्हिसापैकी सुमारे 63 हजार व्हिसा भारतीय व्यावसायिकांना मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर चीनचे व्यावसायिक येतात.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!