आ. गायकवाड यांनी १५ दिवसात माफी मागावी, अन्यथा 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

माजी आ. विजयराज शिंदे यांचा पत्रकार परिषदेत इशारा

प्रतिनिधी | बुलडाणा
बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आश्रम शाळेतील मुलीसंदर्भात केलेले वक्तव्य लांछनास्पद आहे. या प्रकरणी त्यांनी १५ दिवसाच्या आत माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात १०० कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा, माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिला आहे. हा इशारा शुक्रवार १० एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
काही दिवसापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी अशोक खरात यांची तुलना भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या सोबत करत विविध आरोप केली होती. यात त्यांनी आश्रम शाळेतील मुलींचा ही संदर्भ जोडला होता. यात शिंदे यांना शाळेवरील एक महिला मदत करत असल्याचा ही दावा त्यांनी केला होता. या घटनेमुळे जिल्हयाभरात तीव्र पडसाद उमटत असून आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपच्या वतीने केली जात आहे. या अनुषंगीक आज विजयराज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून आ. संजय गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी सदर आरोप हा घाणेरडा असल्याचा दावा करत या बाबत आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी १५ दिवसात माफी न मागितल्यास दाखल करणार १०० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!