संग्रामपूर तालुक्यात भाजपचा विजयोत्सव!

फटाक्यांच्या आतिषबाजीत 'भारत माता की जय' च्या घोषणा

प्रतिनिधी | संग्रामपूर
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या दणदणीत विजयाचा आनंद संग्रामपूर तालुक्यातही साजरा करण्यात आला. या विजयानिमित्य ४ मे रोजी, सोमवारी, तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
भाजप संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विजयोत्सवात पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, जिल्हा महामंत्री गणेश दातीर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गजानन दाणे, जि.प.सर्कल प्रमुख गजानन ठाकरे, जगदीश बकाल, जिल्हा कोषाध्यक्ष लोकेश राठी, डाॕ.अमोल धुर्डे, सुभाष हागे, रामदास म्हसाळ, योगेश पुंडे, गुणवंता खोडके, राजेश मुयांडे, संतोष लोणाग्रे, नितीन हागे, संजय उमाळे, सुभाष बावस्कर, प्रवीण ढोरे, रणजीत डाबेराव, यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख नेतृत्वावर आणि भाजपाच्या राष्ट्रीय विचारधारेवर जनतेचा ऐतिहासिक विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून व्यक्त केला. फटाक्यांच्या आतिषबाजीत परिसराचे वातावरण उत्साहाने भरून गेले होते.

00

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!