हा पक्ष प्रवेश नव्हे विकासाभिमुख नेतृत्वावर असलेला विश्वास आहे – आ. संजय गायकवाड

उबाठा, काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

चिखली,

आज होत असलेला हा पक्षप्रवेश केवळ राजकीय कार्यक्रम नसून जनतेचा विकासाभिमुख नेतृत्वावर असलेला विश्वास आहे. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विकासाची गंगा पोहोचत आहे. त्याच विकासाच्या प्रवाहात बुलढाणा जिल्हाही अग्रेसर राहावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन शिवेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.

ते, मातोश्री संपर्क कार्यालय येथे १७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.  दरम्यान     चिखली मतदार संघातील विविध पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक, महिला तसेच नागरिकांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.      यावेळी उबाठा किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरपालिका उपाध्यक्ष  अशोकराव गव्हाणे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच शिरपूर, केळवद, खंडाळा मकरध्वज, नायगाव बुद्रुक, करतवाडी, नायगाव खुर्द, माळवंडी, डोंगर खंडाळा आदी गावांतील शेकडो पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवक व महिला यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल. आगामी काळात शिवसेनेचे संघटन गावागावात अधिक मजबूत करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहील.    यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार  यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून शिवसेना पक्षाची भूमिका व संघटनात्मक बांधणी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना मुख्य पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, संतोषराव वाकडे, गजानन ठेंग, विश्वासराव खंडागळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, शिवदूत तालुका प्रमुख नितीन राजपुत, कपिल खेडेकर, शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, चिखली शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, युवासेना शहर प्रमुख विठ्ठल जगदाळे, गणेशभाऊ यंगड, शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप पालकर, निलेश अंजनकर, अनमोल ढोरे, शिवसेना दलित आघाडीचे दादाराव महाले, प्रभाकर मोहिते, शरद ताठे, उपसरपंच कुंदन यंगड, शिवाजी शिराळे, उपतालुका प्रमुख अनिल जगताप, बंडू आसाबे, जीवन उबरहंडे, विनोद वनारे, मुन्ना पाटील, ज्ञानेश्वर वाघ, गजानन रामराव गायकवाड, पिंटू गायकवाड, समाधान गायकवाड, उत्तम जाधव, प्रताप गायकवाड, संतोष गायकवाड, प्रमोद गायकवाड, मंगेश बिडवे, श्रीकृष्णा शिंदे, विलास भवर, मोहन सोळंके, दीपक रगड, विजय पवार, राहुल पवार, नितीन सुपे, बबलु मावतवाल, राम शेळके, गजानन जाधव, गोटू शर्मा, गजानन खडके, अक्षय करंडे, मनोज वाघमारे, गजानन भुसारी,यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!