एमबीबीएस अंतिम वर्षात वैष्णवी व्यवहारे यांची उल्लेखनीय कामगिरी; नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम क्रमांक

बुलढाणा

जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती गावची कन्या कु. डॉ. वैष्णवी संगीताताई मोहनराव व्यवहारे हिने एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १८०० पैकी १२९० गुण मिळवून तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून तिच्या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

सारोळा मारोती येथे वाढलेल्या वैष्णवीने लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य आणि गुणवत्ता जपली. तिच्या शैक्षणिक वाटचालीत कुटुंबीयांचे, विशेषतः आजोबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्त्वाची ठरली. जिद्द, मेहनत आणि शिस्तबद्ध अभ्यास यांच्या जोरावर तिने प्रत्येक टप्प्यावर यश संपादन केले.  तिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा मारोती येथे पूर्ण केले. त्यानंतर बुलढाणा येथील एडेड कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला होता.  वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या वैष्णवीने नीट (NEET) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट यश मिळवून नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. शिक्षणादरम्यान सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या बळावर तिने एमबीबीएस अंतिम वर्षात महाविद्यालयात अव्वल स्थान मिळविले.

वैष्णवीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या कर्तृत्वाचे सर्व स्तरांतून स्वागत व कौतुक होत असून अनेक विद्यार्थ्यांना तिच्या यशातून प्रेरणा मिळत आहे. उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजसेवेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करावी आणि आपल्या कुटुंबासह गाव, जिल्हा व राज्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.

डॉ. वैष्णवी व्यवहारे यांचे या भव्य यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!