आ. सिद्धार्थ खरातांनी विधानसभेत मांडली नाभिक समाजाची व्यथा

प्रतिनिधी | साखरखेर्डा

बुलडाणा जिल्ह्यातील नाभिक समाजावर होणाऱ्या अन्याय व अवमानकारक वागणुकीचा मुद्दा आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत उपस्थित करत समाजाच्या भावनांना आवाज दिला. शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देत त्यांनी हा विषय अधिवेशनात ठामपणे मांडला.

     फेब्रुवारी महिन्यात बुलडाणा नाभिक महामंडळाच्या शिष्टमंडळाने आमदार सिद्धार्थ खरात यांची भेट घेऊन समाजाच्या विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. समाजातील लोकांना वारंवार अपमानास्पद विशेषणांनी हिणवले जाते, तसेच उच्चस्तरीय ठिकाणीही दुय्यम वागणूक दिली जाते, अशी खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली.  या भेटीत म. ना. कर्मचारी महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, समाजनेते विजय गवळी, जिल्हाध्यक्ष शिवदास ढोलेकर, महादेव ससाणे, शिवसेना नेते दत्तात्रय मोतेकर व विभागीय अध्यक्ष अविनाश भुतेकर आदींचा समावेश होता. त्यांनी समाजाची स्थिती सविस्तर मांडत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची मागणी केली होती. शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानुसार आमदार खरात यांनी विधानभवनात हा मुद्दा मांडला. यापूर्वीही त्यांनी प्रतापगड येथे वीररत्न जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच वीररत्न जिवाजी महाले आणि संत शिरोमणी राष्ट्रसंत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनदरबारी सुट्टी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने आमदार खरात यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!