शिक्षाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक तोडगा काढणार – आ. श्वेता महाले

समग्र शिक्षाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना आमदार श्वेता महाले पाटील यांचा ठोस पाठिंबा


प्रतिनिधी | बुलडाणा

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत मागील २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुमारे ३३८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक तोडगा काढेल, असा विश्वास चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला.

या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे ९ मार्च २०२६ पासून आमरण उपोषण सुरू असून, आमदार महाले पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या मागण्यांचा आढावा घेतला व शासन स्तरावर या प्रश्नांचा सकारात्मक विचार व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये “समान काम समान वेतन” तसेच १० वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करून कायम करणे यांचा समावेश आहे. शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकारात्मक अहवाल सादर केलेला असून, त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

आमदार महाले पाटील यांच्या भेटीनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे योगिता बलाक्षे, शिवकिरण गोसावी, विवेक राऊत, बालाजी कातुरे, निता देशमुख, प्रमोद पडघान, गजानन वाघ, कैलास भगत, आशिष वाघ, दत्ता काकडे, जनार्दन तनपुरे, मंगेश मोहिते, सचिन तायडे आदी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!