नांदेड गँगवॉर; मध्यरात्री  रुग्णालयात जाऊन 2 जखमींची केली हत्या

प्रतिनिधी | नांदेड

   नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्वेअरलगत शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास 2 टोळ्यांत वाद झाला. त्यावेळी अरिजितसिंग चव्हाण हा धुरंधर-2 चित्रपट पाहून घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात 25 वर्षीय अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील व इतर एकाला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले.   तिकडे हल्लेखोरांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्याची गोष्ट अरिजितसिंग चव्हाणच्या भावाला समजली. त्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयाच्या धाव घेतली. तिथे त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच हल्लकल्लोळ माजला.

या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!