शिवसेनेने सुरु केलाय भाजपाचा गेम?

एक गुंजारतोय, दुसरा मारतोय, राजकारणात चालले तरी का

 

प्रतिनिधी | बुलडाणा

मोडेल पण वाकणार  नाही, या बाण्याने चालणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड सध्या कमालीचे फेक्झीबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या वागण्याने जिल्हयाच्या राजकारणात  अविश्वसनीय घडामोडी  घडत आहेत. शिवसेनेचा एक गडी भाजपला गोंजारतोय तर दुसरा पक्षप्रवेशाच्या आडून विधानसभा मतदार संघाला सुरंग लावतोय. या घटना  व घडामोडीने सर्वसामान्यांचे डोके चक्राउन टाकले आहे.   त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात नेमके चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

आ. संजय गायकवाड हे आधीपासून कुणाचेच काही ऐकत नाही. त्यांना जे वाटते तेच ते करत आले आहे. कुणा समोर ही झुकेगा नही म्हणणारे आ. गायकवाड यांनी लक्ष्यभेद साठी फेक्झीबलपणाचा अवलंब सुरु केला आहे. त्यातच त्यांनी  बुलडाणा विधानसभा मतदार संघ सोडून चिखलीत लक्ष देणे सुरु केले  आहे. या ठिकाणी पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला आहे, कधी ते अप्रत्यक्ष आ. महाले यांच्या विरोधात बोलतात यामुळे भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांची खुर्ची डोलु लागल्याचे चित्र आहे. रेणूका देवी वहन मिरवणूकी दरम्यान आ. संजय गायकवाड यांनी चक्क कांग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांची भेट घेवून चिखलीत खळबळ उडवून दिली आहे. तसा माजी आमदार बोंद्रे व आ. गायकवाड यांच्यात मैत्रीचा कोणताच धागा  नाही. असे असले तरीही संजूभाउ मुददाम बोंद्रेला तर भेटले नसावे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तर दुसरीकडे मित्र पक्षातील पदाधिकारी दुखावले जावू  नये याकडे लक्ष देण्याच्य सुचना देत शिवसेनेचे केंद्रीयमंत्री व खासदार प्रतापराव जाधव मात्र सातत्याने मैत्री टीकवण्याची भाषा करत भाजपच्या मंचावर दिसत आहे.

पक्ष एकच, मात्र एकाच पक्षातील दोन दिग्गजांनी पक्षबळकटीसाठी निवडलेली वाट वेगवेगळी. एक गोंजारतोय, एक मारतोय असे दिसतेय. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने चिखलीत भाजपाचा गेम तर सुरु नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा

चिखली मध्ये शिवसेनेचे विखरलेले कार्यकर्ते यांना एकत्रित आणण्याकरिता व पक्षाशी बांधणी करणे करिता केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात चिखली येथे पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी शेकडो युवकांना आवाहन करण्यात आले आहे.

 

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!