सावधान! पेट्रोल-डिझेल कोणत्याही क्षणी महाग होऊ शकते

इराण ने कतार मध्ये गॅस पुरवठा केला बंद

प्रतिनिधी | दिल्ली
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत 30% पर्यंत वाढ झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून भारतात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास दुप्पट होऊन 146 डॉलरवर पोहोचल्या आहेत. आधीच प्लांट व हल्ला झाल्याने इराण ने कतार चा गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे वायू आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे दर कोणत्याही क्षणी वाढू शकतात.
युद्धापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी ब्रेंट क्रूड 73 डॉलरच्या खाली होते. आता त्याची किंमत वाढून 114 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचली आहे. तर इंडियन बास्केटच्या किमती 71 डॉलरवरून वाढून 146 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.
भारतीय बास्केटची किंमत 146 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. जर कच्चे तेल याच पातळीवर राहिले, तर सरकारी तेल कंपन्यांना सध्याच्या किमतीत पेट्रोल-डिझेल विकणे कठीण होईल. येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 10 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच, गॅसच्या तुटवड्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दरही वाढू शकतात. अलीकडेच, तेल शुद्धीकरण कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली होती. कच्चे तेल केवळ गाड्यांच्या इंधनासाठीच वापरले जात नाही, तर पेंट, प्लास्टिक, खते आणि औषधांच्या कच्च्या मालामध्येही त्याचा उपयोग होतो. डिझेल महाग झाल्याने मालवाहतूक महाग होईल, ज्यामुळे फळे, भाजीपाला आणि धान्याचे दर वाढतील. एकूणच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!