अमेरिका–इराण च्या युध्दात रशियाची उडी? जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठयावर

रशिया, कतारचा ही इशारा, तर अमेरिकेचा आखाती देशांना उकसवण्याचा प्रयत्न

 

 

प्रतिनिधी | मुंबई

मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात धुमसत असलेले युध्द आता मोठा प्रमाणात फोफावत चालले आहे. नागरी व लष्करी ठिकाणावर हल्ले झाल्यावर उर्जा स्थानावर हल्ले वाढले आहे या मुळे सर्वत्र तणाव वाढत आहे. हा वाढता तणाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरत आहे. नाटोचा नकारानंतर अमेरिकेने रणनिती बदलली आहे, आता तो आखाती देशांना इराणच्या विरोधात उकसवतो आहे. तर दुसरीकडे कतार व रशियाने देखील अमेरिका व इस्त्राईल या देशांना चेतावनी दिली आहे. यामुळे आता जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठयावर पोहचल्याची चर्चा होत आहे.

नाटो या लष्करी संघटनेने थेट हस्तक्षेपाबाबत स्पष्ट नकार दिल्यानंतर अमेरिकेने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे. नाटोचा पाठिंबा कमी मिळत असल्याने आता अमेरिकेने मध्यपूर्वेतील आखाती देश — विशेषतः सौदी अरेबिया, युएई आणि कतार — यांना सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान १९ मार्च रोजी इराणने कतार, युएई आणि सौदीच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले . या हल्ल्यामुळे जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला असून, तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

 

अमेरिकेची खेळी अनं तिसरे महायुध्द
नाटो ने या युध्दात कोणताही रस न दाखवल्याने ट्रम्प यांची नाचक्की झाली आहे. त्यानंतर आता इराण ने कतार मधील रास लफान (Ras Laffan) या जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. कतार वर झालेल्या हल्लयानंतर अमेरिकने कतार वर हल्ला सहन केला जाणार नसल्याचे सांगत प्रत्यक्षरिता अमेरिका कतार सह आखाती देशाला प्रोत्साहित करत असल्याचे बोलले जात आहे. या युध्दात आखाती देश उतरले तर, आंतरराष्ट्रीयस्तरावर तेलाचे भाव गणनाना भीडतील, त्यामुळे परिस्थिती नियंत्रण मिळवण्यासाठी इतर देशांना ही उतरावे लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या खेळी मुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरवठयावर पोहचल्याची चर्चा होत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!