इराणचा मास्टरस्ट्रोक; अमेरिका वगळता सर्व देशांसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली

 

प्रतिनिधी | दिल्ली

मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. अमेरिकावगळता जगातील इतर सर्व देशांसाठी होर्मुझची समुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग खुला ठेवण्याची घोषणा इराणने केली आहे.
जगभरात ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग म्हणजे होर्मुझ होय.
अमेिरका, इस्त्रायल व इराण या युद्धामुळे या सामुद्रधुनीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने जगातील अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणने सामुद्रधुनी खुली करण्याबाबत एक निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेत असताना अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आता शत्रू देश (अमेरिका-इस्रायल) वगळता सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा इराणने केली आहे.
इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे अमेरिकेवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इराण संबंध अधिक तणावपूर्ण बनले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!