ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजसह अनेक दारू ब्रँड्सवर बंदी; भेसळयुक्त दारु असल्याचा ठपका

मुंबई,
राज्यात ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजसह इतर अनेक ब्रॅड मध्ये भेसळ होत असल्याचा ठपका ठेवत सदर ब्रॅडवर बंदी आणण्यात आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात विक्री होणाऱ्या अत्यंत लोकप्रिय ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्लू आणि बॅगपायपर यांसारख्या मद्य ब्रँड्सच्या काही विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर थेट बंदी घालण्यात आली आहे. उत्पादनात कृत्रिम रसायने आणि स्वादांचा वापर केल्याचा ठपका या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी FSSAI ने केलेल्या सखोल तपासणीत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दारू तयार करताना जी योग्य नैसर्गिक परिपक्वता प्रक्रिया आणि नैसर्गिक घटकांचा वापर होणे अपेक्षित असते, तो या ब्रँड्सच्या काही उत्पादनांमध्ये करण्यात आलेला नाही. त्याऐवजी, मद्याला विशिष्ट चव आणि सुगंध आणण्यासाठी बाहेरील कृत्रिम फ्लेवर्सची भेसळ करण्यात आल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादित झालेल्या विशिष्ट बॅचेसवर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!